HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचं राजकीय गणित असू शकतं, खडसेंच्या प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उद्या दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत शरद पवार यांनी भाजपाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल असं शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

“एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं. इतका कठोर निर्णय़ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपमधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 1)

News Desk

#COVID19 : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८६८वर, आज दिवसभरात १२० रुग्णांची नोंद

News Desk

फडणवीसांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी, भाजपच्या माजी आमदाराला मारहाण

News Desk