HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena | युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना अद्याप भाजप-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना रविवारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंकडून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप युतीची घोषणा झालेल्या नसताना शिवसेनेकडून होणाऱ्या या एबी फॉर्मच्या वाटपामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ह्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; Atul Bhatkhalkar यांची टीका

News Desk

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाचा धोका वाढला

News Desk

महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’साठी भाजप पुन्हा आक्रमक,काँग्रेसकडून सावधानतेचा सूचक इशारा

News Desk