HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंनी भाजप सोडल्यावर शिवसेनेची पंकजांना साद,’पंकजा मुंडे शिवसेनेत या!’

जालना | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने जे पेरलं ते उगवायला लागले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“भाजपने जी भरती केली होती मला असं वाटत आहे की, आता भाजपची उतरती कळा सुरु झाली आहे. आज एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते राष्ट्रवादीत जात आहेत. तसेच, भाजपमधील काही आणखी दिग्गज नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. मला असं वाटतं की ते नेतेही निर्णय घेतील. आम्ही ज्या पक्षासाठी कामं करतो त्या पक्षाची दारं सगळ्यांसाठी खुलीच आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंनीही शिवसेनेत यावं”, अशी विनंतीही यावेळी खोतकरांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

News Desk

रंगभूमीनंतर आता प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

News Desk