HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवार हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी आज (1 एप्रिल) नितीन गडकरींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत राज्याच्या विविध विकास कामांवर चर्चा झाली आहे. यात राजकीय चर्चा झालेली नसल्याचे बोलले जाते.

 

शरद पवार हे नागपूर  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेच्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी नागपूर दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यापूर्वी देखील शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या दिल्ली आणि पुण्यात भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सर्वांच्या भुवया उंचावल्या.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता याचिकाकर्ते मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

News Desk

मराठा समाजाला विस्थापितांना मोठं होऊन द्यायचं नाही, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

News Desk

मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे | अजित पवार

News Desk