HW News Marathi
राजकारण

स्वाभिमानासाठी नाॅट रिचेबल असणारे रविकांत तुपकर भाजपला रिचेबल .. तुपकरांचा स्वाभिमानीला रामराम !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात मोठ्या प्रमाणत इनकमिंग सुरु आहे. आता तर शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धडाडीचे नेते रविकांत तुपकर हेसुद्धा भाजपात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण रविकांत तुपकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राम राम ठोकला आहे.रविकांत तुपकरांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ,काल दिवसभर त्यांचा फोनसुद्धा नाॅट रिचेबल होता .मुख्यमंत्री व रविकांत तुपकरांमध्ये काल एक तास चर्चा झाली.

रविकांत तुपकर भाजपवासी होणार असल्याची दाट शक्यता आहे. रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या जवळचे नेते होते. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडल्या नंतर रविकांत तुपकर यांनी संघटनेला उचलून धरले होते. मात्र खोत यांच्या नंतर रविकांत तुपकरांनीही राजू शेट्टी यांची साथ सोडली आहे

 

 

https://twitter.com/DhanajayDalvi/status/1177222851499364353

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक

News Desk

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे – धनंजय मुंडे

News Desk

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

News Desk