HW News Marathi
राजकारण

आज संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा मोदी सरकारला बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्यासाठी आता एनडीएच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (२५ मे) संध्याकाळी ५ वाजता एनडीएच्या संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्व विजयी खासदारांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत औपचारिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थित खासदारांना संबोधित करतील. दरम्यान, नरेंद्र मोदी यांची यापूर्वीच एनडीएच्या नेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आज होणारी एनडीएची ही बैठक म्हणजे केवळ एक औपचारिक प्रक्रिया आहे. दरम्यान, ३ जूनपूर्वी १७ व्या लोकसभेचे गठण होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही !

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.

News Desk