HW News Marathi
Covid-19

चीनप्रमाणे भारताला कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणता येईल?

मुंबई कोरोना वायरची सुरुवात ज्या चीनमधून झाली त्या व्हायरसने आज जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगात २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दोन मोठे देश म्हणजे चीन आणि भारत. चीनची लोकसंख्या १५० कोटी तर भारताची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी आता एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्या देशात कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या होती त्याच्या अगदी जवळ भारत पोहोचला आहे.

चीनमध्ये रुग्णसंख्या ८४,४६४ होती तर भारतात सध्या ८२,०८५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे भारतात आज ८५० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली तर देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आजच चीनमधील एकूण कोरोनाग्रस्तांपेक्षाही अधिक होईल.

चीनमध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ३१ डिसेंबरला झाली होती. तिथे ८० हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होण्यासाठी ६३ दिवस लागले होते. त्यानंतर चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले. आणि हळूहळू रुग्ण आणि बळींची संख्या कमी होत गेली. तर दुसरीकडे

भारतात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ३० जानेवारीला केरळमध्ये झाली आणि भारतात ८० हजार रुग्ण होण्यास १०७ दिवस लागले. त्यामुळे चीनप्रमाणे भारताला कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणता येईल का हा एक मोठा प्रश्न उभा राहीला आहे.

चीनमध्ये ७९,२५६ लोक बरे झाले आहेत तर४,६४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आत्ताच्या घडीला फक्त १३२ कोरोनाबाधित चीनमध्ये आहेत. भारतात २७,९६९ रुग्ण बरे झाले आहेत तर २४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. एक दिलासादाय बाब अशी आहे की भारतात चीनप्रमाणे लोकांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.

जगात ‘कोरोना’ची स्थिती काय ?

– जगात कोरोनाबाधितांचा एकूण 45 लाख 20 हजार ६८६

– जगभरात ‘कोरोना’ने झालेल्या मृत्यूचा आकडा 3 लाखांच्या पार

_जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

_ जगात 72 % कोरोनाबाधित केवळ १० देशांमध्ये

_ तर कोरोनाबाधितांच्या संख्येबाबतीत भारत जगात १२ व्या स्थानी

अमेरिकेतील ‘कोरोना’ची स्थिती काय ?

– अमेरिकेत 25 हजार 925 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

– तर गेल्या 24 तासांत 1698 रुग्णांचा मृत्यू

_ अमेरिकेत कोरोनामुळे एकूण 86 हजार 895 मृत्यू

– अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 14 लाख 56 हजारांच्या पुढे

महाराष्ट्रात ‘कोरोना’ची स्थिती काय ?

– राज्यात कोरोनाने झालेल्या मृत्यूचा आकडा 1019

– महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 27 हजार 524

– सद्यस्थितीत 20 हजार 441 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

– राज्यात एकूण कोरोनाबळींपैकी 55% मृत्यू 14 दिवसांत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दुसऱ्यादिवशी देखील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

News Desk

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती ! । जितेंद्र आव्हाड

News Desk

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी

News Desk