HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

पुणे | पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजकांना भीमा कोरेवाग दंगली प्रकरणी अटक केली आहे. यात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुणे, दिल्लीतून माओवाद्यांचे नेते रोना विल्सन आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपूर या तिघांना पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अटक केले आहे. मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी या तिघांना अटक केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकरी अनुयायी येथे आले होते. तेव्हा दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून दगड फेक झाली होती. यात एक जण जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडें यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिलिंद एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या दंगलपूर्वी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या तिघांचे कनेक्शनातून आढळून आले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात या तिघांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले होते.

Related posts

कोणत्याही कुरबुरी न करता बदल्यांचे पत्ते पिसले !

News Desk

पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, तर किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल!

News Desk

निवृत्त अधिकारी नियुक्तीवरही राज्यपाल कायदेशीर सल्ला घेतील! – नवाब मलिक

Aprna