HW News Marathi
महाराष्ट्र

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिस उपअधीक्षकाची जमावानं दगडानं ठेचून हत्या केलीय. या घटनेमुळं संपूर्ण पोलिस प्रशासन हादरून गेलंय. जमाव एवढा प्रक्षुब्ध झाला होता की त्यांनी या डीवायएसपीला विवस्त्र केल्यानंतर त्याची हत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर नोहट्टा परिसरात तणावाचं वातावरण असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक अयूब पंडित यांना मारलं जात असताना, तिथे हजर असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिस महासंचालकांनी त्याचा अहवाल मागवला आहे.

पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडल्यानंतर भडकलेल्या जमावाने हे अमानुष कृत्य केलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नौहट्टा परिसरात डीएसपी मोहम्मद अयूब पंडित जामिया मशिदीबाहेर त्यांची ड्यूटी करत होते. गुरुवारी रात्री उशिरा साडेबारा वारचा काही लोकांनी जामिया मशिदीजवळ अयूब यांना पाहिलं. मोहम्मद अयूब पंडित मशिदीतून बाहेर येणाऱ्या लोकांचे फोटो काढत होते. त्यावेळी लोकांनी अयूब पंडित यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. यानंतर भडकलेल्या जमावाने अयूब पंडित यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्याआधी जमावाने त्यांना विवस्त्र केलं होतं.

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या वक्तीची ओळख पटली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिस महासंचालक एसपी वेद यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर जुना काळ परत येईल, जेव्हा लोक जिप्सी पाहून पळत असत. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. लोकांच्या रक्षणासाठी ड्यूटी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच ठेचून मारलं, असं पोलिस महासंचालक एसपी वेद म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk

अहिल्यादेवी जयंतीला पक्षीय रूप देण्याचा ‘राष्ट्रवादी’ चा प्रयत्न! – राम शिंदे

Aprna

“राज्यातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील”, अजित पवारांचा विश्वास

Aprna