HW News Marathi
राजकारण

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

मुंबई | आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त मुंबई येथील दादर चौपाटीवर बीच प्लीज या संस्थेने स्वच्छ समुद्र किनारा ही मोहिम हाती घेतली होती. या संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते.

यावेळी अदित्य ठाकरेंनी राजकीय साफसफाई पण सध्या सुरू आहे तसेच अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य करणे टाळले. भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र, आज जागतिक पर्यावरण दिन असून या दिनी राजकीय प्रदूषण आणू इच्छित नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

२०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू काही वर्षांपूर्वी प्लास्टिक हे पर्याय म्हणून पाहिले जायचे पण आता हा पर्याय भारी पडतोय. पर्यावरण सुधारण्यासाठी माझे हे म्हणणे आहे. तसेच २०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणालेत.

दादर चौपाटीवर पर्यावरण दिन साजरा

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दादरच्या चौपाटीवर स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेले ४३ आठवडे बीच प्लीज या संस्थेने दादर येथील समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादर येथे मंगळवारी भेट दिली.

Related posts

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?

News Desk

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk

‘एल्गार’चा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा !

News Desk