न्यूयॉर्क | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२४ सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यूएनजीएच्या बैठकीदरम्यान मोदी आणि ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे तोंड भरुन कौतुक करत त्यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ असा उल्लेख केला. ट्रम्प यांची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली.
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील आयएसआय आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ट्रम्प यांनी म्हटले की, नुकतेच पार पडलेल्या ह्युस्टन च्या एन आर जी स्टेडीयममधील कार्यक्रमात ट्रम्प बोलताना म्हणाले की, दहशतवादाविरोधातील मोहिमेत अमेरिका भारतासोबत, अशी भूमिका घेतली होती. या कार्यक्रमादरम्यान ५० हजार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना मोदींनी संबोधित केले.
इस्लामिक दहशतवादाची समस्या दोन्ही देश एकत्र येऊन सोडवतील. दहशतवादाच्या मुद्द्यावर मोदींशी अतिशय मोकळेपणाने चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. भारत आणि पाकिस्तान इच्छा असेल तरच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प काल (२४ सप्टेंबर) म्हणाले होते. मात्र, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याची ठाम भूमिका भारताने घेतल्याने ट्रम्प यांनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.