HW News Marathi
देश / विदेश

कोरोनामूळे ऑलिम्पिक स्पर्धेबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

जपान | कोरोना व्हायरसमुळे अनेक जिल्हे, राज्य, देश लॉकडाऊन करत आहेत. सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात येतायत तर काही पुढे ढकलण्यात येत आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत अजूनही कोणता ठाम निर्णय अद्याप घेतला नसून आज (२३ मार्च) जपानच्या पंतप्रधानांनी ऑलिम्पिकबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसला आहे. एका देशाने करोना व्हायरसमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून जपान ऑलिम्पिकची तयारी केली आहे. हे सर्व करण्यासाठी बराच काळ, पैसा आणि मेहनत लागते. पण आता ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली असताना करोना व्हायरस जगभर पसरला आहे आणि त्यामुळे काही क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. ऑलिम्पिकबाबतही काही देशांनी आपली ठोस भूमिका घेतलेली नाही. पण त्यांना ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी, असेच वाटत आहे

जपानचे पंतप्रधान शिंझो यांनी आज ऑलिम्पिकबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सध्याच्या घडीला पुढे ढकलणे हे अपरिहार्य वाटत आहे. रविवारी (२२ मार्च) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी म्हटले होते की, ” कारण सर्व गोष्टींपेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे. माणसांच्या जीवापुढे खेळ ही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढेच जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, परदेशात रोज ५०० हुन अधिक जण कोरोनामूळे प्राण गमावत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

News Desk

लोकसभा निवडणूक २०१८मध्ये घेणार?

News Desk

सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरुर यांना जामीन मंजूर

News Desk