HW News Marathi
महाराष्ट्र

माझं अतिक्रमण नदी-ओढ्याभोवती होत असेल तरी हटवा, मुलाहिजा बाळगू नका – अजित पवार

बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१७ ऑक्टोबर) सकाळी बारामतीत जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका”, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

वर्षानुवर्षे नदीपात्रासह ओढे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळं अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांसह ओढ्याभोवतालची अतिक्रमणे त्वरीत काढावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याचवेळी अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, असं सांगत अजितदादांनी अधिकाऱ्यांना तत्पर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या. पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना त्यांनी केली. नदी अथवा ओढ्यावर अजित पवारांचे अतिक्रमण असले तरी ते काढून टाका, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी 200 कोटी, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

पार्थ पवार म्हणतात ,जर काही कृती केली नाही तर हाती काही लागणार नाही!

News Desk

कोरोनाच्या संकटात नागरिकांना शहरातील अद्ययावत रुग्णालये देतील दिलासा! । दादाजी भुसे

News Desk