HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ, आज बारामती बंद

बारामती। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. ईडीने शरद पवारांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी बारामती आणि पुण्यात आज (२५ सप्टेंबर) बंद पाळण्यात येणार आहे.

विविध सामाजिक संघटनांनी बंदचे आवाहन केले असून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. आज सकाळी १० वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगणात सगळ्यांना एकत्र जमा होण्याचे आवाहन करण्यात आले. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले.राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याप्रकरणी देशाचे नेते, माजी कृषिमंत्री शरद पवार; तसेच त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संध्याकाळी ही बातमी येताच क्षणी पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत, तर बारामतीत बंद पाळण्याचा स्थानिकांनी निर्णय घेतला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा दणका बसला असल्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळ बोले जाते.

राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अजित पवारसह ७० बड्या नेत्यांवर २६ ऑगस्टला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२० (ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

News Desk

आधी बैलगाडीभर पुरावे आता ६.३ जीबी डेटा ! फडणवीसांवर का टिका होतेय ?

News Desk

HW Exclusive : राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत वंचित बहुनज आघाडी युती करण्यास इच्छुक! – प्रकाश आंबेडकर

Aprna