HW News Marathi
महाराष्ट्र

तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, आशिष शेलारांनी थोपटली पाठ

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे विशेष कौतुक केले आहे. त्याचं काम महाराष्ट्राची मान उंचावणारं आहे, अशा शब्दांत त्यांनी तेजस यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.सामना या वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ट्विटरवरुन शेलार यांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

“जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे.”

ठाकरे यांचे पूर्ण कुटुंब राजकारणात असूनही राजकारणापासून लांब राहणाऱ्या तेजस ठाकरे यांना जैवविविधतेतील संशोधनात रस आहे. यासाठी ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कायमच भटकंती करीत असतात. नुकतीच त्यांनी माश्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली. अंबोली गावमधील हिरण्यकश नदीमध्ये त्यांनी सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा शोधला आहे. सोनेरी रंगाचे केस असणारी ही माशांची २० वी प्रजाती असून तेजस ठाकरेंनी शोध लावलेली चौथी प्रजाती आहे.

तेजस ठाकरे यांनी लावलेल्या या शोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनाही मान्यता दिली आहे. या प्रजातीसंदर्भातील लेख नावाजलेल्या मासिकांमध्ये छापून आले आहेत. ही प्रजाती हिरण्यकश नदीत सापडल्यामुळे त्याचे नाव हिरण्यकेशी असं ठेवण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले म्हणजे ते अजित पवारांनी फोडले असं होत नाही

News Desk

शरद पवार उद्या दिल्लीत विरोध पक्षांची बैठक घेणार

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk