HW News Marathi
Covid-19

प्रदेशाध्यक्ष म्हणून फक्त पक्षाची भूमिका मांडतात, भाजपमध्ये त्यांचे योगदान शून्य !

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेवारांनी अर्ज देखील दाखल केले आहे. महाविकासआघाडी ५ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर भाजपही चारही निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहे. मात्र, भाजपच्या निष्ठवंत आणि जेष्ठांना डावलून नवीन लोकांना तिकीट दिल्यामुळे भाजपेचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नेतृत्वावर काल (१२ मे) टीका केली होती. संघटना म्हणून काय काम करायचे असते ते चंद्रकांत पाटलांना काही माहिती नाही. ते प्रदेशाध्यक्ष असल्याने फक्त पक्षाची भूमिका मांडण्याचे काम करत आहेत, असे म्हणत पुन्हा एकदा खडसेंनी आज (१३ मे) भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

खडसे म्हणाले, ” राज्यात भाजपला तळागाळात पोहचवण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य खर्ची केले. पक्षाने खूप काही दिले हे मी मान्य करतोच. पण राज्यात पक्षाला आम्ही उभे केले आहे. संघटना म्हणून काय काम करायचे असते ते चंद्रकांत पाटलांना काही माहिती नाही. ते प्रदेशाध्यक्ष म्हणून ते फक्त पक्षाची भूमिका मांडण्याचे काम करत आहेत. भाजपमध्ये त्यांचे योगदान शून्य आहे, असा टोला लगावून खसेंनी लगावला, खडसेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया देताना ते बोलत होते.

संबंधित बातम्या

माझा पत्ता राज्यातील नेत्यांनीच कट केला, खडसेंचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपयांचे वितरण सुरू

News Desk

राज्यात आज ११,५१४ नवे रुग्ण तर १०,८५४ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेशकडून मदतीचा हात ! ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा

News Desk