मुंबई | बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन यावरुन राजकारण देखील तापले आहे. यावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
याआधी सचिन सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित होत होता. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
Bengaluru Police have come here to probe drug connection of Vivek Oberoi & filmmaker Sandip Ssingh. But NCB is not taking up the investigation. We'll request NCB to investigate the drug connection & if they don't, Mumbai Police will do it: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/fXqGdub0iT
— ANI (@ANI) October 16, 2020
ड्रग कनेक्शनमधीस संदीप सिंहचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध यामुळे बॉलिवूड आणि भाजप नेते पुन्हा चर्चेत आले आहेत. तसंच भाजपचे मागील निवडणुकीतील स्टार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचे ड्रग कनेक्शनचा तपास करण्याची सचिन सावंत यांची मागणी केली आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आहेत. त्यामुळे आता हे ड्रग्स प्रकरण काय वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
I had demanded with NCB to investigate the BJP Drug connection in bollywood. In my questions to NCB I had specifically mentioned name of Aditya Alva found in Sandalwood drug racket who is brother in law of Vivek Oberoi who is partner of Sandeep Ssingh. But NCB didn't pay heed https://t.co/lwHGTtvujc
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.