HW News Marathi
क्रीडा

 आमच्यावर टीका करा पण स्टेडियममध्ये या

मुंबई | आम्ही सुद्धा चांगले खेळतो. तुम्ही स्टेडियममध्ये या, आमचा खेळ पाहा, खेळ आवडला नाही, तर आमच्यावर टीका करा पण स्टेडियममध्ये या असे आवाहन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनी प्रक्षेकांना केले आहे. सध्या मुंबईतील अंधेरी येथे मुंबई फुटबॉल एरिनात येथे फोर इन्टरकॉन्टिनेन्टल कप चौरंगी फुटबॉल स्पर्धेतला होता. या अंतर्गत भारत आणि चीन तैपई सामना नुकताच झाला. हा सामना पाहण्यासाठी मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे.

त्यामुळे छेत्री यांनी हा भावनिक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन प्रक्षेकांना स्टेडियमकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारत आणि चीन तैपईचा ५ – ० असा पराभव करत, तर कर्णधार सुनील छेत्री यांनी तीन गोल मारत हॅटट्रिक मारत संघाला विजयी मिळवून देण्यात सिंहाचा वाट उचलला. कोहली म्हणतो, ‘ सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़’

आपण सर्वांनी खेळाडूंसोबत उभे राहून त्यांना पाठिंबा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. देशाचे नाव उंचवण्यासाठी खेळाडू कठोर परिश्रम करतात, असे माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन मुंबईत

News Desk

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

सचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk