HW News Marathi
राजकारण

मुंबईत भाजप पदाधिका-यांची बैठक

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज मुंबईत दिवसभर भाजपच्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक सुरु झाली आहे.

दादरमधील बैठकीनंतर दुपार नंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक होणार आहे. पुन्हा रात्री मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगाल्यावरही भाजप मंत्र्यांची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी या बैठका होत असल्याची माहिती मिळत सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

पालघरमध्ये विजय झाला असला तरी भंडारा-गोंदियामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. पालघरमध्येही तुलनेत भाजपची मते कमी झाली आहेत. या बैठकांमधून भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल । ठाकरे

swarit

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk

“पंतप्रधान मोदी नीच” या आपल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम

News Desk