HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचे पेट्रोल पंपांवरील सर्व फलक काढा !

मुंबई । विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. “विरोधी पक्षांच्या फलकाप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत”,अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.

“निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही. पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान मोदींचे फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत”, असे सचिन सावंत म्हणाले.

“सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम असताना या फलकांबद्दल प्रशासन बोटचेपी भूमिका का घेत आहे? आचारसंहितेच्या नियमानुसार प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत. पण सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या जाहिराती पेट्रोलपंपांवर लावलेल्या आहेत. त्या तात्काळ काढून घ्याव्यात”, अशी मागणी सचिन सावंत यांनी कर्ली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसची ऐतिहासिक पत्रकार परिषद

swarit

…तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

News Desk

एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांकडून विरोध

News Desk