HW News Marathi
मुंबई

करी रोड-एल्फिन्स्टन रोडवर शिवसेनेचे आंदोलन

मुंबई | मुंबईतील करी रोड आणि एल्फिन्स्टन रोड पूलावरील वाहतूक १ जूनपासून एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा प्रयोग सुरु केला होता. मात्र करी रोड, परळ आणि लोअर परळ परिसरातील सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे फसला आहे. वाहतूक पूर्ववत न केल्याने शिवसेनेने आज (सोमवारी) सकाळी या प्रयोगाविरोधात आंदोलन केले.

एल्फिन्स्टन रोडवर पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा एकेरी मार्ग सुरू केला. परिणामी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वेला आणि पश्चिमेला जाण्यासाठी वळसा मारावा लागत आहे. करी रोड आणि परळच्या मध्यभागी मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा निर्णय वाहतूक प्रशासनाने घेतल्यामुळे येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सामान्यांना याचा खूप त्रास होतोय, मोठमोठे मॉल, टोलेजंग इमारती आणि पंचतारांकित हॉटेल्सकडून आलेल्या दबावामुळे हा प्रयोग केला जातोय, असा आरोप स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी केला असून त्यासाठी सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

News Desk

पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्तांचा जोरदार दणका

News Desk

सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार

News Desk