नाशिक | नाशिक पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना स्मार्ट पोलिस पुरस्कार २०१८ ने गौरविण्यात आले आहे. डिजीटलमध्ये केलेल्या कामासाठी नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल आणि त्यांच्या संपूर्ण टिमला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गुन्ह्याच्या संदर्भातील माहिती पोलिसांपर्यंत लोकांना जलद पोहचवता यावी यासाठी नाशिक पोलिसांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. यामुळे होणारे गुन्ह्यांचे निवारण लक्षात घेऊन यंदा या पुरस्काराने नाशिक पोलिसांचा गौरव करण्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
@nashikpolice has been awarded 'SMART Policing Award- 2018.!' For it’s Third I Digital Platform for Enhancing Policing and Prevention of Crimes & incidents.
I congratulate Dr. Ravinder K Singal.. We are truly proud of the Maharashtra Police..! Keep it up.. @DGPMaharashtra— Dr. Ranjit Patil (@Ranjitpatil_Mos) June 2, 2018
सिंगल यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविल्यानंतर गृहराज्य मंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आपल्या पर्सनल ट्विटर हॅंडलच्या माध्यमातून रविंद्र सिंगल यांचे शनिवारी अभिनंदन केले आहे. अनेकांनी सोशल मिडीयावर शुभेच्छा देताना आयुक्त सिंगल यांच्या कामाचे प्रचंड कौतुक केल्याचे पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.