HW News Marathi
महाराष्ट्र

कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार – सुप्रिया सुळे

पुणे | पुण्यात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे. तर कात्रज येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. कात्रज परिसराला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार आहे, असे थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी काल पुण्यात झालेल्या पावसाचा तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली. तसेच कात्रज येथील प्राणी संग्राहालयातही केली पाहणी. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कात्रज नाल्याच्या भोवतीच्या संरक्षक भिंत दोन वर्षांपूर्वी पुरामध्ये वाहून गेल्यानंतर अजूनही भिंत बांधण्यात आलेली नाही. वारंवार स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही पुणे महापालिकेकडून निधी दिला जात नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ५ मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाले नाहीत, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

ग्रामीण मुलींना मिळणार 12 वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास

News Desk