HW News Marathi
Covid-19

मद्य प्रेमींसाठी खुशखबर, मद्य खरेदीसाठी ई-टोकन सुविधा सुरु !

मुंबई | कोरोनामूळे सध्या देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामूळे तिला स्थिर करण्यासाठी आता काहीतरी हालटाल करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र, लोकांनी दुकानांसमोर तुफान गर्दी केल्याने आता सरकारने एक वेगळाच मार्ग निवडला आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता मद्य विक्रीच्या खरेदीसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या तरी हा निर्णय पुण्यापुरताच मर्यादीत असून मुंबईत याची सुरुवात होणार का या बद्दल अद्याप माहिती मिळाली नाही आहे.

या ई-टोकण साठी ग्राहकांनी https://www.mahaexcise.com या संकेतसेथळावर भेट द्यायची आहे. त्यानंतर यावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन ग्राहकांना दिले जाणार आहे. हे करताना ग्राहकाने आपला मोबाईल नंबर आईणि नाव द्यायचे आहे. तसेच, आपला जिल्हा आणि पिन कोडही देणे गरजेचे असणार आहे. या सर्व बाबी भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचे आणि आपले ई-टोकन ग्राहकांनी घ्यायचे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११,०८८ नवे रुग्ण आढळले 

News Desk

पुण्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अजित पवारांची केंद्राकडे मागणी  

News Desk

कोरोना १०० वर्षातील सर्वात मोठे संकट – शक्तिकांत दास

News Desk