HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या… उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आहे संपत्ती !

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (११ मे) विधान परिषदेच्या सदस्य पदाचा अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शपथपत्र सादर केले. यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे संपत्ती जाहीर केली आहे.

यानुसार मुख्यमंत्र्यांकडे व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण मालमत्ता २४ कोटी १४ लाख इतकी आहे. कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स – २१ कोटी ६८ लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता २४ कोटी १४ लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.

उद्धव यांची स्थावर मालमत्ता ५२ आहे कोटी ५४ लाख आहे. उद्धव यांनी १९८६ ते १९८८ दरम्यान रायगड जिल्ह्यात ५ प्लॉट्स घेतले होते त्याची किंमत ९५,००० आहे. एका जागेवर त्यांचे फॉर्महाऊस आहे त्याची किंमत ५ कोटी रुपये आहे. अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत ४ कोटी २० लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत १३ कोटी ६४ लाख इतकी आहे.

बांद्रा इस्ट आणि बांद्रा वेस्ट या रहिवासी जागांची एकूण किंमत ३३ कोटी ७३ लाख इतकी आहे. उद्धव यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता ५२ कोटी ४४ लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एचडीएफसी बॅंकेचे ४ कोटी रुपयाचे कर्ज आहे.

उद्धव यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ६५ कोटींची आहे. रश्मी ठाकरे यांच्या उत्पन्नाचे साधन बिझनेस आहे. उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेतन, डिव्हिडंड फंड आणि कॅपिटल गेन हे आहेत. उद्धव ठाकरेंविरुद्ध २३ केसेस पेंडिंग आहेत, पण दोषी एकातही नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या १४ हजार ५४१ वर

News Desk

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार 

News Desk

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

News Desk