HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसे १७ तारखेला राष्ट्रवादीत जाणार ! राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला दुजोरा…

अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्याच पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. तसेच, ते पक्षांतर करणार अशाही चर्चा सुरु होत्या. नेमकी ते कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नव्हते मात्र पहिले नाव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येत होते. त्यामुळे आथा कुठेतरी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार यावर त्यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबरला कमळाचे फुल सोडत हातात घड्याळ बांधणार असल्याचे समजले जात आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार (MLA) आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

#EknathKhadse #SharadPawar #AjitPawar #BJP #NCP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Mahavikasaghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Milind Narvekar आणि Ashok Chavan MVA मधून बाहेर पडणार?

Seema Adhe

ISRO Chandrayan-2 | देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा

Gauri Tilekar

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच; Raj Thackeray सुद्धा तयारीत?

Manasi Devkar