मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नवी आकडेवारी आज (१३ ऑक्टोबर) जारी करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल १५ हजार ३५६ नव्या रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज मिळाला आहे. तर गेल्या २४ तासांत राज्य १८७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
Maharashtra reports 8,522 new coronavirus cases, 15,356 discharges & 187 deaths, taking total cases to 15,43,837 including 12,97,252 discharges, 2,05,415 active cases & 40,701 deaths: State Health Department pic.twitter.com/YizsiSNWCN
— ANI (@ANI) October 13, 2020
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ४३ हजार ८३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण तब्बल १२ लाख ९७ हजार २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कोरोनामुक्तांचा आकडा वाढत असल्याने राज्यासाठी हि चांगली बातमी आहे. तर आतापर्यंत एकूण ४० हजार ७०१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.