नाशिक | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज (१९ सप्टेंबर) समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये यात्रेला समारोप होणार आहे. मोदी आज दुपारी ११ वाजता ओझर मधील एचएएलच्या विमानतळावर विमानाने येथून सभास्थळी ते हेलिकॉप्टरने येणार आहेत. नाशिकमध्ये दुपारी १ वाजता मोदींची सभा पार पडणार आहे.
नाशिकमधून होणार असल्याने मोदी आणि फडणवीस यांच्याकडून राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या सभेत होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान मोदींना विशेष सुरक्षा असल्याने एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कमांडो बुधवारी (१८ सप्टेंबर) नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी मोदींच्या सभास्थळाचा ताबा घेतला असून परिसरात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सोबतच पोलिसांचेही विशेष संरक्षण राहणार आहे.
सभेसाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सार्वजनिक वितरण व मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, जयकुमार रावळ आदींसह अनेक मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.