HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसची गळती थांबण्याचे नाव घेतना दिसत नाही. आता पक्षाचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माता सुनील तटकरे हे नसून त्यांचा पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री त्यांच्या निवास्थानी जाणून भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसांत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे तटकरेंनी दिले आहेत.

विशेष म्हणजे याआधीही अवधूत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध चांगले नसल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांचे भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आले नाही. २०१६ ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

News Desk

राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव स्वगृही परतले

News Desk