HW News Marathi
मुंबई

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल

मुंबई | नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे आता पुन्हा एकदा या लॉकडाऊनच्या काळात चर्चेत आली आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन सुरु आहे. सगळं काही ठप्प झाले आहे. कोरोना’च्या या संकटकाळात लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पूनमविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला.

आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार चालवताना पूनमला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पूनम आपल्या मित्रसोबत विनाकारण भटकंती करत असल्याच्या आरोपाखाली मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तिला अटक केली आहे. तसेच, तिच्यी सोबत असलेल्या सॅम अहमदलाही पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडेची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. तिच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या कलम १८८, २६९ आणि ५१ ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे जिल्ह्यातील नवीन विमानतळासाठी आवश्यक परवानग्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार- मदन येरावार

News Desk

डान्स बारचा धंदा सर्वत्र तेजीत

News Desk

संगम प्रतिष्ठान करणार गड- किल्ले संवर्धन

News Desk