HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींना दिली निपाह व्हायरसची उपमा

हरयाणा | भाजपाचे वाचाळवीर मंत्री कधी काय बरळतील याचा कुणालाही अंदाज लावता आलेला नाही. आजपर्यंत अनेक कारणांनी टिकेचे धनी झालेले हरयाणातील भाजपचे मंत्री अनिल वीज हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात. मंगळवारी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अनिल वीज यांनी चक्क राहुल गांधींना निपाह व्हायरसची उपमा दिली आहे. ‘राहुल गांधी हे निपाह व्हायरससारखे असून जो पक्ष त्यांच्या संपर्कात येईल तो नष्ट होईल असे वादग्रस्त ट्विट वीज यांनी केले आहे. वीज यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप कॉंग्रेस असे शाब्दिक युद्ध पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

News Desk

#LokSabhaElections2019 : उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

News Desk

“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा

Aprna
राजकारण

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

swarit

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्याविरोधात पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार ३० मे रोजी मुंबईच्या अणुशक्तीनगरमध्ये भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. अनेकांना दरवाढ का होत आहे याचे समर्पक कारण सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु कर्नाटक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सरकार दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल दरवाढ करत असल्याचा तर्क सर्वसामान्य जनता लावताना पहायला मिळत आहे. या दरवाढी विरोधात महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत.

नंदुरबार सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक गुजरातला जाऊन पेट्रोल भरत आहेत. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेलच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले गेले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मुंबईत ३० मे रोजी सकाळी १० वाजता पांजरापोळ सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

 

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता! – देवेंद्र फडणवीस

Aprna

RamMandir : अशी आहे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार

Aprna