HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांनंतर सुप्रिया सुळेंचे मुलाखत कुणाल कामरा घेणार?

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांची कॉमेडियन कुणाल कामरा यावने नुकतीच मुलाखत घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कुणाल कामराची भेट घेतली आहे. त्यांनी ट्विट करत With Kunal Kamara असे लिहिले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही ‘शट अप या कुणाल’मध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता लागली आहे. सुप्रिया सुळेंनी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरासोबतच्या भेटीचा फोटो ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 

कुणालन आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे आता संजय राऊत यांची मुलाखत कशी असणार? ते पाहण्याची उत्सुक्ता सगळ्यांनाच लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांवरील छापेमारीत राजकीय सुडबुद्धीचा प्रकार नसावा, राऊतांचे मत

News Desk

“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप!

News Desk

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

News Desk