HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

…तोपर्यंत शिवसेनेबरोबर युती करणार नाही !

मुंबई | मीरा-भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौरांच्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाची तोडफोड केली होती. या प्रकरणानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असे विधान केले आहे. मेहता म्हणाले की, ‘शिवसेना निवडून येता, ते फक्त भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे निवडून येतात. काल (१७ सप्टेंबर) तोडफोडींची जी घटना घडली. ती अत्यंत दुर्दैवी घटना असून महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळी करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मारामारी करणे, आई बहिणीवर शिवीगाळ करणे अत्यंत निंदनीय असून महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन तोडफोड करून शिवीगाळ करणे म्हणजे अत्यंत शरमेची गोष्ट आहे.

शिवसेनेने तोडफोड करून जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे. यासाठी जनतेचे पैसे वापरले आहेत ते काही तुमच्या घरचे नाहीत, हे त्यांना भरावे लागतील. त्यांना याचे उत्तर येणाऱ्या महासभेत दिले जाईल. शिवसैंनिकांना आता नागरिकच उत्तर देतील .एकीकडे महिलेच्या सन्मानाची गोष्ट करतात आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करतात. कलादालनाचा ठराव करण्यात आला आहे. तो ठराव भाजपनेच आणला आहे. परंतु त्यासाठी आर्थिक बजेट पाहिजे ते महापालिकेकडे नाही. यासाठी दोन करोड रुपये महापालिका व ते २३ करोड रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे. शिवसेनेचा आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या पाच वर्षात एकही रुपया या कामासाठी आणला नाही. आणि वरून बोलतात बजेट करा पैसे येतील पैसे कुठून येणार ? बजेटमध्ये मान्यता मिळाली नाही तरी निवडणूक आहे म्हणून उद्घाटन करायचे हे चुकीचे आहे .स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे स्मारक आहे. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे. तेव्हा ठराव आम्हीच केलेला असल्यामुळे आम्हाला ही त्याची चिंता आहे. परंतु, त्यासाठी बजेट नाही या दोन्ही कलादालनासाठी ४८ करोड महाराष्ट्र शासन देणार आहे.

प्रताप सरनाईक गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करत आहेत परंतु एक रुपया मिळाला नाही आणि इकडे येऊन जबरदस्तीने विषय घ्या सांगतात. निवडणुका आहेत पण तुमच्या निवडणुकांमुळे काय जनतेचा बळी देणार का, असा प्रश्न नरेंद्र मेहता यांनी केला आहे. आता जनतेची वेळ आली आहे की, त्यांना उत्तर द्या आम्ही तर वेळोवेळी त्यांना उत्तर दिले आहे. ‘मी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांशी बोलून घडलेला प्रकार निंदनीय आहे. हे सहन केले जाणार नसून त्यांची जर अशीच वर्तणूक राहिली तर प्रताप सरनाईक व त्यांच्या नगरसेवकांनी सभागृहात येऊन माफी मागितली नाही, तर शिवसेनेबरोबर युती करणार नाही,’ असे मेहता यांनी सांगितले. मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर जनतेचे बळी देऊन, महिलेचा अपमान करून, जनतेचे नुकसान करून अशी युती आयुष्यात करणार नाही असे मेहता यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमधील वाद अत्यंत टोकाला गेल्याची घटना काल (१७ सप्टेंबर) मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये घडली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीची बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या मुद्द्यावरून शिवसेना नगरसेवकांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कलादालनाच्या विषयाकडे महापौरांकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक होत आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवीगाळ करत महापौर कार्यालय आणि स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

News Desk

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’ निवासस्थानी करणार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्री

News Desk

आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आम्ही युतीच्या भानगडीत पडणार नाही !

News Desk