HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

कराड | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (१४ सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती राहणार असल्याचे उदयनराजे यांनी ट्विटद्वारे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला, यावरून मोदींच्या उपस्थिती भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होता. परंतु त्यांच्या प्रवेशावेळी मोदींच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सातऱ्यातून आज (१६ सप्टेंबर) कराडमध्ये दाखल झालेल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान घटनात्मक पद आहे. राजकीय प्रवेशाच्या कार्यक्रमांना पंतप्रधानांना उपस्थित राहता येत नाही. तसा प्रोटोकॉल (शिष्टाचार) आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी उदयनराजे यांच्या प्रवेशाला हजर राहू शकले नाहीत. मात्र, मोदी यांनी उदयनराजेंच स्वागत केले आहे. तसेच भेटायलाही बोलवले आहे. १९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी उदयनराजे यांची भेट होणार आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सोपल आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk

उदयनराजे भोसलेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

News Desk

येत्या दोन दिवसांत युतीसंदर्भात घेणार निर्णय | उद्धव ठाकरे

News Desk