HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

येत्या दोन दिवसांत युतीसंदर्भात घेणार निर्णय | उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपासाठी बैठका चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या बैठकीत युतीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले आहे. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी काल (९ सप्टेंबर) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर युतीबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंनी यावेळी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले.

दरम्यान, ठाकरे म्हणाले की, “युतीसंदर्भात येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसबोत मिळून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.” पत्रकारांनी ठाकरेंना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले आदित्य यांचा ही एक दिवस राहुल गांधी होईल. यावर बोलतांना ठाकरें म्हणाले, ‘बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी वर बोलावे’ असा सल्ला त्यांना दिला.

राज्य सरकारच्या गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हटले, शिवसेना सत्ते असो किंवा नसो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याबाबत कोणी वेडे वाकडे करेल असे वाटत नाही म्हणून मी आता पर्यंत काही बोललो नाही असंही त्यांनी स्पष्ट करत सावध भूमिका घेतली. तसेच देशातील घुसखोरी करणाऱ्या बंगलादेशी नागरिकांना बाहेर काढायलाच हवे, कोणाला बांगलादेशी नागरिकांना हवे असतील, त्यांना मांडीवर घेऊ बसावे, अशी टीका त्यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही !

News Desk

गणेशोत्सावानंतर विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार ?

News Desk

अखेर उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

News Desk