HW News Marathi
महाराष्ट्र

जे आमच्यावर भूंकत आहेत त्यांच्या मनात भीती आहे!

मुंबई | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्यांवरून चर्चा सुरू असून, राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्याचबरोबर विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. याच मुद्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार आशुतोष यांनी मुलाखत घेतली आहे.

आशुतोष यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. “एक प्रश्न विचारतोय. आपण वाईट वाटून घेऊ नका आणि उत्तर द्या. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांविरोधात कुणी एक शब्द बोलून बाहेर पडू शकत नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना धडा मिळाला. उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल एका टिव्हीचा संपादक मागील दोन महिन्यांपासून ज्या प्रकारची भाषा वापरत आहे, एक अभिनेत्री कंगना रणौत ज्या पद्धतीची भाषा बोलत आहे. तुम्हाला वाटत का शिवसेना कमजोर झाली आहे?,” असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता.

“शिवसेना कुमकुवत झालेली नाही. शिवसेना सत्तेत आहे. आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आमचे लोग खूप रागात आहेत. आम्ही आधीही सांगितलं की, जेव्हा विरोधी बाकांवर होतो, तेव्हा एका इशाऱ्यावर लोक रस्त्यावर उतरत होते. जे वाटेल ते आम्ही करायचो. माझ्यावर १४० पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. पुढेही घाबरणार नाही. सत्ता येते. सत्ता जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही, आम्हीही राहणार नाही. सगळ्यांना जावं लागणार आहे. सोडावी लागणार आहे. जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू. विसरलेलो नाही. आमचा अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे,” असं उत्तर देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit

मनसेच्या १५ व्या वर्धापदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिल्या मनसैनिकांना शुभेच्छा!

News Desk

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

News Desk