HW News Marathi
देश / विदेश

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | “भाजपकडून ‘गो बॅक मोदी’चा नारा देणाऱ्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे”, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवरून पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आज (८ मे) भाजपकडून विधान परिषदेसाठी ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांची नावे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. तर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना भाजपकडून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एच.डब्ल्यू. मराठीने एकनाथ खडसे यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

“विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी मी स्वतः पक्षाकडे मागणी केली होती. महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाला कदाचित निष्ठावंतांपेक्षा अधिक नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची असेल. त्यामुळे पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मी गेली ४० वर्षे पक्षात निष्ठेने काम केले आहे. त्यामुळे आताही पक्षाच्या या देखील निर्णयासोबत मी आहे. मात्र, पक्षाकडून यापूर्वी ‘गो बॅक मोदी’चा नारा देणाऱ्या गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असे एकनाथ खडसेंनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. त्याचप्रमाणे, खडसेंसह आम्ही पंकजा मुंडेंशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाज शरीफ यांना सात वर्षांची सजा

News Desk

राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने अज्ञाताने भिरकावला दगड, मोटरमन जखमी

News Desk

नासामध्ये गलेलठ्ठ पगार कमावण्याची संधी

News Desk