HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळांमुळे माझा विजय

नाशिक | छगन भुजबळ यांच्यामुळे आजचा विजय शक्य झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नरेंद्र दडारे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेनेने येवल्यातील नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. गेल्या दोन टर्ममध्ये या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक जयंत जाधव आमदार होते.

बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन शिवसेनेने भुजबळांच्या मतदारसंघातील व त्यांचे एकेकाळचे अनुयायी नरेंद्र दराडेंना उमेदवारी दिली होती. गुरुवारी विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक मधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे ४१२ मते प्राप्त करत विजयी उमेदवार ठरले. निकालानंतर माध्यमांशी बोलताना दराडेंनी येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांच्यामुळे आजचा विजय शक्य झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मतदानाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरेंची संचिव मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीनंतर भुजबळ समर्थकांनी सेनेच्या उमेदवाराला मदत केल्यामुळे हा विजय मिळाल्याचे दराडेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. भुजबळांची जामीनावर सुटका झाल्यानंतर सामनामध्ये भुजबळांची बाजु घेणारा अग्रलेख छापला गेला होती. त्यानंतर शिवसेनेशी आपला जुना घरोबा असल्याचे भुजबळ म्हणाले होते त्यामुळे नरेंद्र दराडेंच्या विजयात भुजबळांचा हातभार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका अमान्य!

News Desk

सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केला निषेध…

News Desk

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त आव्हान

News Desk