मुंबई । महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी श्रीकांत दातार या मराठमोठ्या माणसाची निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून श्रीकांत दातार यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी श्रीकांत दातार यांचे अभिनंदन करत “मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो”, अशी ईच्छाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे श्रीकांत दातार यांच्याबद्दल काय म्हणतात ?
जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्या तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.
श्री श्रीकांत दातार यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करुन गेला. चार्टर्ड अकाऊंटंट -आयआयएमएमधून व्यवस्थापनाचं शिक्षण – स्टेनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी-कार्नेजी मेलन येथे अध्यापन – पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेक स्कूलचे डीन.
या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयस विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा.
जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रीम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्री श्रीकांत दातार यांचं मनापासून अभिनंदन. मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो हीच इच्छा.
#श्रीकांतदातार #हार्वर्डबिझनेसस्कुल #मराठीमाणूस #NewDeanofHarvard #HarvardBusinessSchool #ShrikantDatar #MarathiPride pic.twitter.com/a4hjStGmhx
— Raj Thackeray (@RajThackeray) October 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.