HW News Marathi
राजकारण

निरंजन डावखरेंचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | कोकण पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी व माजी विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे हे गुरुवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात निरंजन डावखरे भाजपात प्रवेश करतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण आज राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडत आहोत. त्याचबरोबर मी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. यापुढील वाटचाल मी लवकरच जाहीर करेन. अशा आशयाचे ट्विट करत निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडल्याचे बुधवारी जाहिर केले होते. डावखरे भाजपात जाण्याची चर्चा असताना अखेर गुरुवारी भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेला पत्रकामुळे डावखरे भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या विविधतेला विरोध करत स्वतःला देशभक्त तर इतरांना देशद्रोही ठरविले जाते !

News Desk

दोस्ती ग्रुपसोबत बीएमसीची खास दोस्ती – संजय निरुपम 

News Desk

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

News Desk