HW News Marathi
महाराष्ट्र

जपानचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई | जपानच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जपानच्या NEC कंपनीचे अध्यक्ष डॉ.नोबूहीरो इंडो, मॅनेजिंग डायरेक्टर ताका युकी इनाब, राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.

भारतात आणि महाराष्ट्रामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी NEC कंपनी भारतातील पहिली लॅब मुंबई येथे सुरू करणार आहे. या लॅबमध्ये कोर टेक्नॉलॉजीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच शहरामधील वाहतूक व्यवस्था मालवाहतुकीच्या क्षेत्रातील आव्हानांवर कृत्रिम बुद्धीमत्ता व माहिती विश्लेषकांच्या माध्यमातून उपाययोजना शोधण्यावर भर दिला जाणार आहे.यावेळी NEC कंपनीमार्फत मुंबईमध्ये डिसेंबर 2018 ला होणाऱ्या सोल्युशन कोरसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता परमबीर सिंह गायब, गृहमंत्री वळसे पाटील यांचे वक्तव्य!

News Desk

सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का? – अनिल देशमुख

News Desk

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

News Desk
मुंबई

मुंबईत वाचक जागराला सुरूवात

News Desk

मुंबई | मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी प्रकाशकांची प्राथमिक बैठक नूकतीच आयोजित करण्यात आली होती. मराठी वाचन संस्कृती वाढावी, वाचक संख्या वाढावी या उद्देशाने ग्रंथालयाच्या विश्वस्त खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विश्वस्त अरविंद तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, प्रमुख कार्यवाहक विश्वास मोकाशी आणि प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला राज्यभरातील ३० हून अधिक प्रकाशक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘वाचकजागर’ उपक्रम तात्काळ घेण्याचे ठरले. जून महिन्यापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांनी केले. तसेच त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात वाचकांचा राबता वाढवा म्हणन सर्वातोपरी सहकार्य करेन असे त्यांनी सांगितले. दोन्ही संस्थांच्या आवाहनाला प्रकाशकांनी प्रतिसाद देताना काही महत्त्वपुर्ण मुद्दे मांडून काही उपक्रम आणि योजनांची माहिती दिली.

विकास परांजपे यांनी वाचन जागर उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील पिढीला वाचनाचा आनंद मिळावा म्हणून अभिवाचन उपक्रम करावा असा सल्ला दिला. पत्रकार शीतल करदेकर यांनी प्रकाशक, वाचक आणि लेखक यांच्या भेटीचा एक दिवस ठरवावा, प्रत्येक प्रकाशकाने आपले पुस्तकं ग्रंथलयास भेट द्यावी असे मत मांडले. तसेच सुदेश हिंगलासपूरकर यांनी जसा ग्रंथालयाने सहकार्याचा हात पुढे केला आहे, तसा प्रकाशकाने सहकार्य करावे, मी ग्रंथालीच्या नियतकालिकात या उपक्रमासाठी दोन पाने देत असल्याचे सांगितले.

माधव शिरवळकर यांनी दुर्मिळ पुस्तकं डिजिटलाईज होण्यासाठी ओसिआर तंत्राचा वापर करावा. तसेच तरूणांना वाचणाची आवड निर्माण होण्यासाठी किंडल साधणाचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. अस्मिता विभाग यांनी संदर्भ विभाग अधिक लोकाभिमुख करण्याची विनंती केली. लता गुठे, अमोल नाले, संतोष बाईंग, अरविंद जोशी, विवेक नेत्रे, अरुण म्हात्रे, श्रीधर ठोंबरे, श्रीमती विद्या फडके व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते. यापुढील दर तीन महिन्यातून अशी एक बैठक घेण्याचे ठरले आहे.

 

Related posts

‘देशमुखांच्या अडचणीत आणखीनच वाढ,’ काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा!

News Desk

वॉशिंग मशीन आणि गुजरातचा ‘निरमा’चा बॅनर; ‘मविआ’चे सरकारविरोधात आंदोलन

Aprna

उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण :नितेश राणे

swarit