HW News Marathi
राजकारण

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे | कर्नाटक विदानसभा निवडणुक झाली असली तरीही दररोज कर्नाटकच्या राजकारणात नवीन घटना पहायला मिळतात. कर्नाटक निवडणुकीदरम्यान कुमारस्वामी आणि एच. डी. देवेगौडा फोनवरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या संपर्कात होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका सभेत केला. त्याचबरोबर सर्वात कमी कालावधीचा मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या रुपात भाजपाने देशाला दिल्याची टिका देखील पवार यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरोधात चाललेल्या आंदोलनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अजित पवार बोलत होते. नरेंद्र मोदींचा आता करिश्मा राहीलेला नाही तर महागाईने देशात उच्चांक गाठलेला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे याविरोधात जोरदार हल्लाबोल करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सुराज्य यात्रा काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ?’

Gauri Tilekar

भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन; विद्या चव्हाण यांचे टिकास्त्र

Aprna

नितीन गडकरी रुग्णालयात दाखल

News Desk