नवी दिल्ली | देशातील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५२ हजार ९५२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज (७ मे) दिली आहे. आतापर्यंत देशात १५ हजार २६६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ३५ हजार ९०५ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
Total number of #COVID19 positive cases in India rises to 52,952 including 35,902 active cases, 1783 deaths, 15,266 cured/discharged and 1 migrated: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/VW1C8Ya3oa
— ANI (@ANI) May 7, 2020
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात डॉक्टार, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यापैकी ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोररोनाची बाधा झाली असून ही सर्व आकडेवारी केंद्र सरकारकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या आकडेवारीत कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि शिपाई यांचा समावेशन नाही.
राज्यात आज 1233 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 16758 अशी झाली आहे. आज नवीन 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3094 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 6, 2020
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. काल (६ मे) १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.