HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, उदयनराजेंनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट भाजप प्रवेशाला ब्रेक लावला आहे. पुण्यातील पवारांच्या मोदी बाग निवासस्थानी जाऊन उदयनराजेंनी आज (१२ सप्टेंबर) सकाळी १० वाजाता भेट घेतली. यावेळी उदयनराजेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थिती असून या भेटीदरम्यान त्यांची मनधरणी करण्यात पवारांना यश आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उदयनराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्ष सोडू नये म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेत त्यांना पक्षांतर न करण्याची विनंती केली होती. उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी सोमवारी ( ९ सप्टेंबर) पुण्यात काही कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जायचे की राष्ट्रवादीतच राहायचे यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली होती.

या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यांना माहिती दिली. मुंडे म्हणाले, की आजची बैठक विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी होती. पक्षाची भूमिका काय असेल, यासाठी चर्चा झाली. पक्षाची भूमिका काय याबाबत सविस्तर चर्चा झाली. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंनी कधीच वक्तव केलेले नाही. शिवस्वराज्य यात्रेवेळी त्यांच्यामागे अनेक कामे होती. त्यामुळे त्यांना येता आले नाही. अशी माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’ निवासस्थानी करणार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्री

News Desk

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव आज हाती शिवबंधन बांधणार

News Desk