HW News Marathi
राजकारण

किरीट सोमय्या ‘नॉट रिचेबल’

मुंबई | मुलुंडचे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. सोमय्यांनी जनसंपर्क अभियाना दरम्यान एका मराठी फेरीवाल्याशी झालेल्या वादात त्या फेरीवाल्याला धक्काबुक्की केली तसेच त्याच्या हातातील नोटा फाडून त्याच्याच तोंडावर फेकल्याची घटना घडली आहे. हे वृत्त सर्वत्र पसरताच सोमय्या ‘नॉट रिचेबल’ झाले असून, त्यांनी त्यांचा मोबाइल फोन एका कर्मचाऱ्याकडे दिल्याचे त्यांच्या कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींना सांगण्यात येत आहे. या प्रकरणी खासदार सोमय्या यांच्या विरोधात नवघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. विषेश म्हणजे या तक्रारीला प्रतिउत्तर म्हणून सोमय्या यांनी सुद्धा फेरीवाल्याविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे.

मुलुंड मधील संभाजीराजे मैदानात भाजपच्या नगरसेविकेमार्फत स्केटिंग ट्रॅक बांधण्याच्या तसेच मैदानातील काही भागाच सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्या बांधकामांविरोधात न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. संभाजीराजे मैदानात ‘मैदानाचा बळी का घेतला जातो आहे, स्केटिंगची आम्हाला गरज नाही’, अशा अनेक प्रश्नांनी किरीट सोमय्या यांना स्थानिक नागरिकांनी भंडावून सोडले होते.

दरम्यान सोमय्यांकडे नागरिकांनी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली. त्यावेळी सचिन खरात नावाच्या आंबेविक्रेत्याकडून एका स्थानिक महिलेने आंबे विकत घेतल्याचे १५० रुपये देत असताना किरीट सोमैय्या यांनी ते पैसे हिसकावून घेतले त्यातील २० आणि १० रुपयाच्या नोटा हातातून खेचून घेत त्या फाडून टाकल्या आणि नंतर फेरीवाल्याला धक्काबुक्की सुद्धा केली. पुन्हा इथे फळे विकण्यास मनाई करत किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सचिन खरात यांच्यावर १२५० रुपयांचा दंड ठोठावला गेला. त्यानंतर सचिन खरात यांनी सुद्धा किरीट सोमय्या यांनी मेहनतीचे पैसे फाडल्याची तक्रार नोंदवत त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२७ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते | नरेंद्र मोदी

News Desk

विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 

Aprna

#RamMandir : शरद पवार यांचा राम मंदिरावरुन सेनेला टोला

News Desk