HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामी घेणार सोनिया गांधींची भेट, मंत्रीमंडळाबाबत चर्चेची शक्यता  

नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर शनिवारी पडदा पडला असला तरीही अद्याप कोणत्याही पक्षाने कर्नाटकात सत्ता प्रस्थापित केलेली नाही. यापुढे कर्नाटकातील राजकीय गणित काय असतील तसेच कर्नाटकातल्या सत्तावाटपावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे नियोजित मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी सोमवारी दिल्लीत आहेत. राजधानी नवी दिल्लीत असलेले कुमारस्वामी आज कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच आजच्या भेटीत कुमारस्वामी व राहुल गांधी, सोनिया गांधी हे मंत्रिमंडळाच्या वाटपासह इतर मुद्यांवरही चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

जेडीएसची आमदार संख्या कॉंग्रेसच्या तुलनेत कमी असूनही सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसने जेडीएसचा मुख्यमंत्री करा असे ठरविल्यामुळे तसेच कॉंग्रेस पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने खात्यांचे वाटप करताना दोन्ही पक्षांच्या वरीष्ठांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. आजच्या चर्चेनंतर काँग्रेसच्या वाट्याला ३० तर जेडीएसच्या वाट्याला १५ ते १७ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या परमेश्वरा यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कर्नाटकात कोणत्या नेत्याची कोणत्या खात्यासाठी वर्णी लागणार हे पहाणे येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पदवीधर निवडणुकीत ‘मविआ’कडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर

Aprna

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात !

News Desk