HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? या आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून… गृहमंत्र्यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचले

मुंबई | बिहारचे माजी पोलिस संचालक गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट जेडीयूने तर नाकारलेच मात्र भाजपनेदेखील नाकारले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या पांडे यांचा दोन्ही पक्षाकडून पत्ता कट करण्यात आला. हाच मुद्दा धरत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे.

गुप्तेश्वर पांडेंना भाजपनं उमेदवारी द्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का, असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्याचे उत्तर भाजपकडे नसावे. त्याच भीतीतून त्यांनी पांडेंना तिकीट नाकारले असावे, असे सांगत गृहमंत्री देशमुख यांनी फडणवीस यांना पुन्हा एकदा टार्गट करण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी सुशांतसिंगच्या आत्महत्येचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार आहेत का ? गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? असे प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले माजी डीजीपी पांडे हे बिहारची विधानसभा निवडणुक ही बक्सर येथून भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता भाजपने बक्सरच्या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk

राज्यभर पर्यटन पर्व मोठ्या उत्साहात

News Desk

सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज! – प्रविण दरेकर

Aprna