HW News Marathi
महाराष्ट्र

२५ ते २७ नोव्हेंबर विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन बंद राहणार

पंढरपूर | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २५ आणि २६ नोव्हेंबरला पंढरपूर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे २५-२७ नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचं सध्या सुरु करण्यात आलेलं मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा २६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून २० मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील ६ विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. २३ आणि २४ नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरु असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बंद असलेलं मुखदर्शन पुन्हा २८ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीनं दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आज पुण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

News Desk

दानवे म्हणाले- “मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो”

News Desk

देशात युद्धजन्य परिस्थिती, २ दिवसांचं अधिवेशन बोलवा!

News Desk