HW News Marathi
Covid-19

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण

मुंबई। राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (५ मे) दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २६,पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

  • मुंबई : ९९४५ (३८७)
  • ठाणे: ८२ (२)
  • ठाणे मनपा: ४६६ (८)
  • नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
  • उल्हासनगर मनपा: १२
  • भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)
  • मीरा भाईंदर मनपा: १८२ (२)
  • पालघर: ३१ (१)
  • वसई विरार मनपा: १६१ (४)
  • रायगड: ५६ (१)
  • पनवेल मनपा: १०७ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६)
  • नाशिक: २१
  • नाशिक मनपा: २७
  • मालेगाव मनपा: ३६१ (१२)
  • अहमदनगर: ४४ (२)
  • अहमदनगर मनपा: ०९
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: २४ (१)
  • जळगाव: ४७ (११)
  • जळगाव मनपा: ११ (१)
  • नंदूरबार: १९ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)
  • पुणे: १०३ (४)
  • पुणे मनपा: १८३६ (११२)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
  • सोलापूर: ३ (१)
  • सोलापूर मनपा: १२७ (६)
  • सातारा: ७९ (२)
  • पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)
  • कोल्हापूर: ९ (१)
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
  • सिंधुदुर्ग: ३ (१)
  • रत्नागिरी: १० (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)
  • औरंगाबाद:३
  • औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
  • जालना: ८
  • हिंगोली: ५५
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)
  • लातूर: १९ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ३
  • नांदेड मनपा: २८ (२)
  • लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
  • अकोला: ७ (१)
  • अकोला मनपा: ५६ (५)
  • अमरावती: २ (१)
  • अमरावती मनपा: ५९ (९)
  • यवतमाळ: ९२
  • बुलढाणा: २४ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: १७९ (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)
  • इतर राज्ये: ३० (५)

एकूण: १५ हजार ५२५ (६१७)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

Aprna

दिलासादायक | महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ हजारांपेक्षा कमी रूग्ण

News Desk