HW News Marathi
Covid-19

दिलासादायक | महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ हजारांपेक्षा कमी रूग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत अनेक दिवसांनंतर ११ हजारांच्या खाली नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज १०,२१९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन २२,०८१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.२५% झाले आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1401910645897850887?s=19

 

तर मुंबईत ७२८ नवे रूग्ण आढळले आहेत. ९८० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या लाटेवर आता शिवसेनेनं केला सवाल!

News Desk

#Coronavirus : रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

News Desk

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, पुणे व्यापारी संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी!

News Desk